भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे. आमच्या विकासासाठी निलेश राणे यांच्या सारखा आमदार मिळतोय म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केलंय. ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील. तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणारच. गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी ज्या 50 योजना आणल्या त्यामुळे देशाची प्रगती झाली.

महाराष्ट्र सरकारने सुद्धा मागील अडीज वर्षात महाराष्ट्र गतिमान रीतीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न केलाय. या निवडणुकीत महायुतीकडून सर्वच चांगले उमेदवार दिले आहेत. महायुतीचे सरकार परत येईल असा माझा विश्वास आहे. जनहीत, जनकल्यान हे आमचं हीत आहे. अप्रतिम लोकप्रतिनिधी म्हणून निलेश राणेंची ओळख आहे त्यामुळे ते विजयी होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निलेश राणे यांच्या विजयात महत्वाची ठरेल,” असे ते म्हणाले.
*वैभव नाईक निष्क्रिय, राणेंचा खोचक टोला*
नारायण राणे यांनी यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, “वैभव नाईकने इकडे काही केल नाही. मालवण मध्ये अनेक सुविधा नाहीत ते कोणाचं काम ? वैभव नाईक हा निष्क्रिय आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे रोज हजेरी लावायचा आणि हा निष्ठावान ? आम्ही कधी कॉन्ट्रॅक्ट नाही घेतलं, टक्केवारी नाही घेतली. ज्याला बोलता येत नाही असा आमदार पाहिजे कि लोकसभेत काम केलेला आमदार पाहिजे हे लोकांनी ठरवावं,” असे ते म्हणाले.