वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण राणे

भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे. आमच्या विकासासाठी निलेश राणे यांच्या सारखा आमदार मिळतोय म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केलंय. ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील. तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणारच. गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी ज्या 50 योजना आणल्या त्यामुळे देशाची प्रगती झाली.       

महाराष्ट्र सरकारने सुद्धा मागील अडीज वर्षात महाराष्ट्र गतिमान रीतीने विकसित व्हावा यासाठी प्रयत्न केलाय. या निवडणुकीत महायुतीकडून सर्वच चांगले उमेदवार दिले आहेत. महायुतीचे सरकार परत येईल असा माझा विश्वास आहे. जनहीत, जनकल्यान हे आमचं हीत आहे. अप्रतिम लोकप्रतिनिधी म्हणून निलेश राणेंची ओळख आहे त्यामुळे ते विजयी होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निलेश राणे यांच्या विजयात महत्वाची ठरेल,” असे ते म्हणाले.

*वैभव नाईक निष्क्रिय, राणेंचा खोचक टोला*

नारायण राणे यांनी यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, “वैभव नाईकने इकडे काही केल नाही. मालवण मध्ये अनेक सुविधा नाहीत ते कोणाचं काम ? वैभव नाईक हा निष्क्रिय आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे रोज हजेरी लावायचा आणि हा निष्ठावान ? आम्ही कधी कॉन्ट्रॅक्ट नाही घेतलं, टक्केवारी नाही घेतली. ज्याला बोलता येत नाही असा आमदार पाहिजे कि लोकसभेत काम केलेला आमदार पाहिजे हे लोकांनी ठरवावं,” असे ते म्हणाले.

  • विजय बासुतकर

    Related Posts

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण

    भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे भाष्य केले आहे. नारायण राणे यावेळी म्हणाले, “येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीने निलेश राणे यांच नाव घोषित केले आहे.…

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण

    वैभव नाईक निष्क्रिय, ५० हजाराच्या मताधिक्क्याने निलेश राणे निवडून येतील: नारायण राणे

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून सात जणांची माघार

    निवडणुकीतून 7 जणांची माघार, जिल्ह्यात निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38 -जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह

    जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश !

    • By admin
    • November 3, 2024
    • 17 views
    जिल्ह्यात १७ नोव्हेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश !
    error: Content is protected !!